भारत विकास परिषदेचा उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
देशात ॲनिमीया मुक्त अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत तालुक्यातील सिद्धनाथ विद्यामंदिर सातवा मैल, श्री गोपालकृष्ण विद्यामंदिर गोपाळपूर आणि महिला मंडळ प्राथमिक शाळा पंढरपूर या शाळेतील मुलींच्या शरीरातील रक्तामधील लोहाचे ( हिमोग्लोबिन) तपासणी केली. या तिन्ही शाळेतील मुलींची तीन वेळा तपासणी केली. तिसऱ्या तपासणीच्या वेळेस तिन्ही शाळेतील सर्व मुलीचे हिमोग्लोबिन चांगले दिसल्याचा रिपोर्ट आला. आता या पुढे अजून शाळेत हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती भार विकास परिषदेचे सचिव डॉ अनिल पवार यांनी दिली.
भारत विकास परिषदेच्या वतीने सेवा अंतर्गत विविध शिबीर, माहिती आदी कामे केली जातात. दोन वर्षा पूर्वी देशाच्या आरोग्य विश्यिक माहिती समोर आली. यात सर्व वयोगटातील स्त्रियांना अॅनिमीयाने ग्रस्त असल्याचे जाहीर केल. यासाठी अॅनिमीया मुक्त अभियान राबविण्याचे काम सुरु झाले. त्या अनुषंगाने भारत विकास परिषद पंढरपूर शाखेने तालुक्यातील तीन शाळा निवडल्या. यामधील सर्व मुलींचे रक्त तपासणी, औषधोपचार मोफत केला. सुरुवातीला या शाळांमध्ये आम्ही मुलींच्या हिमोग्लोबिनची तपासणी केली. त्यावेळेस ४० ते ४५ टक्के मुली या अॅनिमीया असलेल्या आढळून आल्या. की ज्यांचं हिमोग्लोबिन हे सामन्य पेक्षा खूप कमी होतं. अशा सर्व मुलींना आम्ही तीन महिन्याची मोफत औषध उपचार केला. त्यांचे समुपदेशन केल. सहा महिन्यानंतर परत याच तीन शाळेमध्ये आम्ही पुन्हा तपासणी शिबीर घेतले. त्यावेळेस असे आढळून आले की अॅनिमीयाचे प्रमाण हे कमी झालं असून ते दहा ते पंधरा टक्के वर आलं. त्यावेळेस परत आम्ही त्या मुलींना औषधे व समुपदेशन केले. व त्यांना तीन महिन्यासाठी मोफत औषध उपचार केला. त्या नंतर बरोबर सहा महिन्यांनी म्हणजे ३१ जुलै २४ ला आम्ही या तीनही शाळेमध्ये परत हिमोग्लोबिन तपासणी शिबीर घेतले. यावेळेस आश्चर्यजनक असे चित्र दिसून आले. या तीनही शाळेमध्ये एकही मुलगी अॅनिमीया ग्रस्त असलेली दिसून आली नाही.
सिद्धनाथ विद्यामंदिर सातवा मैल कासेगाव येथे मुलींची संख्या २२० दुसरी शाळा श्री गोपाळकृष्ण विद्यामंदिर गोपाळपूर येथे मुलींची संख्या १६० व तिसरी शाळा महिला मंडळ प्राथमिक शाळा पंढरपूर यामध्ये मुलींची संख्या आहे १०० आहे. आज या तीनही शाळेचे हिमोग्लोबिन तपासणीनंतर या सर्व शाळेतील मुली अॅनिमीया मुक्त झाल्याचे जाहीर केले. लोहाची कमतरता, जीवनसत्वाची कमतरता, रक्तस्त्राव या कारणामुळे अॅनिमीया होतो. या साठी काही खाण्या पूर्वी हात धुणे, सकस आहार , वैद्यकीय तपासणी वेळोवेळी करावी. हिरव्या पालेभाजी, आद्लीन्ब,सफरचंद, कडधान्य ,मांसाहार करावा. विशेषता मुलीनी आहारा बरोबर व्य्व्याम करावा असे मार्गदर्शन डॉ वर्षा काणे यांनी केले. भाविप चे अध्यक्ष मंदार लोहोकरे यांनी भाविप सदस्य यांनी सहकार्य केल्याचे सांगितले.तिन्ही शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,संस्थेचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे भार विकास परिषदेचे खजिनदार अजित कुलकर्णी यांनी सांगितले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा