maharashtra day, workers day, shivshahi news,

महाविकास आघाडीकडून सिंदखेडराजा विधानसभेसाठी मनोज देवानंद कायंदे यांच्या उमेदवारी साठी जुनेद अली यांची दिल्ली वारी

काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अहोरात्र झटणारा खंदा शिलेदार

Nomination of Manoj Devanand Kayande for Sindkhedaraja Legislative Assembly , Sindkhedaraja ,shivshahi news.

शिवशाही वृतसेवा, सिंदखेडराजा  तालुका प्रतिनिधी , आरिफ शेख 

सिंदखेडराजा तालुक्यात मनोज देवानंद कायंदे हे नाव मतदार संघाला नवीन नाही . सिंदखेडराजा मतदार संघात च नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असलेला युवा चेहरा म्हणजे मनोज देवानंद कायंदे होय.ते सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी अनेक आंदोलने केली आहे.  कित्येक वेळा सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस हा विचाराचा पक्ष आहे हे विचार सातत्याने कायंदे यांचे योजना पुर्वक नियोजन असते.

त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सरचिटणीस पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अहोरात्र झटणारा खंदा शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे. शहरांमध्ये व त्याचबरोबर ग्रामीण भागात मनोज कायंदे हे सर्वत्र फिरत असतात.प्रत्येकाच्या हाकेला धावणारा जनसामांन्य कार्यकर्ता आहे , व सामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारा युवा चेहरा आहे. त्याचबरोबर त्यांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व राजकीय क्षेत्रात मोठी पकड आहे. याच अनुषंगाने त्यांना सिंदखेडराजा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून कॉग्रेस पक्षा कडुन त्यांना संधी मिळावी म्हणून, काँग्रेस नेते जुनेद अली यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची दिल्ली येथे भेट घेतली मनोज देवानंद कायंदे यांच्या नावाची शिफारस बुलढाणा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

तसे बघितले तर महाराष्ट्रात फोडाफोडीचे आणि पैशाच्या जोरावर राजकारण चालू आहे, परंतु हा महाराष्ट्र शाहु फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला धरुन चालणारा आहे. इथे निष्ठेला किंमत देणारा मतदार वर्ग आहे.

आणि त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे महायुतीमध्ये पूर्वाश्रमीचे सर्व उमेदवार आहेत त्यामध्ये सध्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे त्याचबरोबर माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर आणि तोताराम कायदे माजी आमदार , व या अगोदर आमदारकीची निवडणूक लढवलेले विनोद लक्ष्मण वाघ हे देखील महायुतीतच आहे त्यामुळे सर्व लढणारे उमेदवार महायुतीत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची गोची निर्माण झालेली आहे अध्याप एवढे तरी स्पष्ट दिसत आहे. अन्यथा त्यांना निवडणूक लढवायची असल्यास युती धर्म मोडावा लागेल . परंतु महाविकास आघाडीकडे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासाठी पाहिजे तसा मातब्बर उमेदवार दिसून येत नाही परंतु त्यामध्ये युवा संपूर्ण जिल्ह्याला परिचय असलेल्या जिल्हा परिषद सदस्य व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मनोज देवानंद कायंदे हे नवखे जरी असले तरी ते महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराला आवाहन देऊ शकतात हे मात्र खरे आहे. त्यामुळे तळागाळातून मनोज कायंदे यांच्या नावाची मागणी होत आहे

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !