छ. शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारणार
शिवशाही वृतसेवा, सांगोला (तालुका प्रतिनिधी)
सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्यांचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यासाठी माझ्यासह शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधीत सर्व शासकीय अधिकारी यांची पुतळा समितीची बैठक तातडीने आयोजीत करावी. तसेच पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली
--------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा