maharashtra day, workers day, shivshahi news,

वाई पोलिसांकडू अकरा लाख रुपये किंमतीचा गांजाचा साठा हस्तगत

वाई पोलीसांनी आरोपीच्या आवळ्या मुसक्या

Cannabis worth eleven lakhs seized, police action, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे

बुधवार दिनांक २८ रोजी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या गोपनीय खबऱ्या मार्फत बातमी प्राप्त झाली की, ईस्माइल आदिल ईनामदार रा फुलेनगर ता वाई जि सातारा हा शहाबाग फाटा वाई ता वाई जि सातारा येथे त्याच्या मालकीच्या पत्र्याचे शेडमध्ये चोरुन बेकायदेशीर रित्या गांजाची विक्री करीत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरबाबत मा. पोलीस अधिक्षक सोो व उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांची परवानगी घेऊन सदर गोपनीय बातमीच्या अनुषंगाने गुन्हेप्रकटीकरण पथकासह सदर ठिकाणी जाऊन सापळा रचुन छापा मारला असता सदर ठिकाणी इसम ईस्माइल अदिल ईनामदार वय ३१ रा. फुलेनगर वाई हा मिळुन आला त्यानंतर सदर इसमाचे पत्र्याचे शेडचे कसुन झडती घेतली असता, लोखंडी कॉटचे खाली तीन प्लास्टिकची पोती दिसली त्यातुन उग्र वास येत असल्याने ती बाहेर काढुन उघडुन पाहिले असता, त्यामध्ये गांजासदृश्य वनस्पती मिळुन आल्याने सदरचा गांजा हा कशाकरिता आणला आहे याबाबत ईस्माइल ईनामदार याचेकडे विचारणा केली असता, सदरचा गांजा हा चोरुन विक्री करीता आणला असल्याचे त्याने सांगितले सदरचा गांजा हा सुमारे १०,६२,२५०/- रुपये किंमतीचे ४२.५०० किलोग्रॅम वजन असलेला होता. तो पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. समिर शेख, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम, सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. जितेंद्र शहाणे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो. हवा विजय शिर्के, पो. हवालदार अजित जाधव, पो. कॉ प्रसाद दुदुस्कर, पो. कॉ नितीन कदम, म.पो.कॉ श्वेता गायकवाड पो. कॉ हेमंत शिंदे, पो. कॉ श्रावण राठोड, पो. कॉ विशाल शिंदे, पो. कॉ प्रेमजित शिर्के यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी करीत आहेत. मा पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख यांनी वाई तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !