maharashtra day, workers day, shivshahi news,

जी एस महानगर बॅंकेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण साधारण सभा मुंबई येथे खेळी मेळीच्या वातावरण संपन्न

बँकेच्या वतीने विविध गुणवंतांचा सन्मान

51st Annual General Meeting of Mahanagara Co-operative Bank , parner , shivshahi news.

शिवशाही वृतसेवा, पारनेर  जिल्हा प्रतिनिधी,  सुदाम दरेकर

सॉलिसीटर गुलाबराव शेळके महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबईतील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .

 रिझर्व बँकेने सक्षम बँकांसाठी नमूद केलेल्या सर्व निकषांची पूर्तता करत जी एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेचा सन २०२३ व २४ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा मागील वर्षापेक्षा १० कोटी रुपयांनी वाढवून ३० कोटी रुपये इतका झालेला आहे . तसेच बँकेस सातत्याने " अ " ऑडीट वर्ग प्राप्त झालेला आहे . बँक नक्त एन पी ए चे प्रमाण शेकडा शून्य टक्के राखण्यात यशस्वी झालेली असून यापुढेही एन पी ए चे प्रमाण शुन्य राखण्याचा मानस आहे . बँकेने सन सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षात एकूण ठेवी २ हजार ८८५ कोटी रुपये असे एकूण कर्जे १ हजार ५७४ कोटी असा एकूण ४ हजार ४५९ कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असून बँकेची गुंतवणूक १ हजार ४९५ कोटी रुपये इतकी आहे .

  जी एस महानगर बँकेची सर्व च स्तरावर नेत्रदिपक कामगिरी करीत असून बँकेचा लौकिक व विश्वासार्हतता बँकेने कायम टिकवून ठेवलेली आहे . बँकेच्या भव्य व सुसज्ज अशा स्वमालकी च्या ९ मजली नवीन प्रशासकीय कार्यालयीन इमारतीचे दिवंगत सॉलिसीटर गुलाबराव शेळके साहेबां चे स्वप्न साकार होत असून लवकरच बँकेच्या लालबाग येथील जुन्या जागेतून नवीन प्रशासकीय कार्यालयात स्थलांतरीत होत आहे , अशी माहिती जी एस महानगर बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात दिली .

  या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळांनी केलेल्या शिफारशीनुसार सर्वसाधारण त्यांच्या भाग भांडवल रकमेवर शेकडा १० टक्के लाभांश जाहीर केलेला आहे, तसेच बँकेचे सभासद, ठेवीदार व खातेदार यांच्या सक्रिय सहभागाने बँकेची प्रगती शक्य झालेली असून त्या सर्वांचे व बँकेचे अधिकारी कर्मचारी , दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांचे महानगर बँकेचे अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांनी बँकेच्या वतीने आभार व्यक्त केले .

 यावेळी सभेच्या विविध विषयांचे संचालकांनी वाचन करून सभासदांनी ही सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात एकमुखी मंजूरी देण्यात आली . या प्रसंगी सभासदांनी उपस्थित केलेल्या मुद्दांनाही संचालकांनी उत्तरे दिल्याने ही ५१ वी वार्षिक सर्व साधारण सभा अतिशय खेळी मेळीत संपन्न झाली .


    बँकेच्या वतीने गुणवंतांचा सन्मान

    बँकेच्या ५१ व्या वार्षिक सर्व साधारण सभेत सभासद व त्यांच्या गुणवंत , ज्ञानवंत पाल्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी बँकेचे सभासद व पत्रकार सुरेश खोसे पाटील यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नगर जिल्हा सचिव पदावर निवड करण्यात आल्याबद्दल बँकेच्या अध्यक्षा श्रीमती शेळके यांच्या हस्ते व संचालक मंडळ , सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शाल व पुष्प गुच्छ देवून गौरविण्यात आले . ]

----------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !