उपस्थिततांना आश्चर्याचा सुखद धक्का
शिवशाही वृत्तसेवा, पुणे
एखाद्या पक्षाचा सर्वोच्च नेता सर्वोच्च नेता आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कसे बळ देतो याचे उत्तम उदाहरण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घालून दिले आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पुण्यात महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींचा एक स्नेह मेळावा घेतला होता. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अचानक उपस्थिती लावली आणि उपस्थित त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यासोबत फोटो काढण्याची त्यांची इच्छा देखील पूर्ण केली हा किस्सा दिलीप धोत्रे यांनी स्वतः सांगितला आहे. त्यांच्याच शब्दात पहा नेमके काय घडले होते.
माझ्या पंढरपूर मधील पण पुण्यातील सर्व मित्र मैत्रिणींनी माझ्या वाढदिवसानिमित्त हॉटेल J W Marriot सेनापती बापट मार्ग पुणे या पंच तारांकित हॉटेल मध्ये सन्मान आणि स्नेहभोजन आयोजित केले होते.
शुक्रवारी रात्री मी राजसाहेबाना भेटण्यासाठी बीड ला गेलो होतो त्यावेळी मी साहेबाना सांगितले होते की साहेब मी आत्ता पुण्याला चाललो आहे कारण माझ्या कॉलेज च्या सर्व मित्र आणि मैत्रिणी यांनी हॉटेल J w marriot पुणे येथे माझा सन्मान ठेवला आहे. साहेब मला म्हणाले "सांभाळून जा आणि पोचला की फोन कर"
शनिवारी नियोजित कार्यक्रम सुरु झाला, गप्पा सुरु असताना माझे सर्व मित्र म्हणत होते की दिलीप आम्हाला राज साहेबांना भेटायचं आहे फोटो काढायचा आहे.
सन 1992 पासून ची इच्छा आहे.1992 पासून माझ्या या सर्व मित्रांना बरोबर घेऊन पंढरपूर येथे त्यावेळचे पंढरपूर कॉलेज आताचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या कॉलेजवर भारतीय विद्यार्थी सेनेची शाखा काढली होती आणि मी कॉलेज प्रमुख झालो होतो.
या सर्व मित्रानी त्यावेळी झालेल्या कॉलेजच्या निवडणुकीमध्ये मला निवडून आणले होते आणि माझ्या आयुष्यातील राजकीय जीवनाची विजयी सुरुवात त्यावेळे पासून झाली होती.आम्ही Bsc ला होतो.
त्यावेळी पासून हे सर्व माझे मित्र माननीय राज साहेब ठाकरे यांचे समर्थक आहेत आणि त्यांची इच्छा होती की राजसाहेब ठाकरे यांना भेटायची. मी मित्रांना सांगत होतो की साहेब लवकरच पंढरपूर ला येणार आहेत त्यावेळी आपण साहेबाना भेटू.
पण काय या सर्व गप्पा सुरु असताना देवाच्या मनात आले आणि साक्षात राजसाहेब ठाकरे हॉटेल J W marriot वर आले. आम्हाला आश्चर्याचा धक्काचं बसला. साहेब आले माझ्या सर्व मित्रांना भेटले, त्यांची विचसारपूस केली आणि फोटोही काढले आणि सर्वांची मनात असलेली इच्छाही पूर्ण केली.
याला म्हणतात नेता.. नेता असावा तर राजसाहेब ठाकरे यांच्या सारखा... धन्यवाद साहेब..
मनसे नेते दिलीप बापू धोत्रे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा