maharashtra day, workers day, shivshahi news,

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची रविवारी महत्त्वपूर्ण बैठक

विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले व आमदार शहाजीबापू पाटील मार्गदर्शन करणार

MLA shahaji patil, shivsena, pandharpur, sangola, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सांगोला (तालुका प्रतिनिधी महादेव भोसले)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी रविवार दि ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी नेमणूक केलेले शिवसेनेचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख  विजय चौगुले व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे. तरी या बैठकीला सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी रविवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला या ठिकाणी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित राहणार आहेत. 

या बैठकीला शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, माजी गटनेते आनंदा माने, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, माजी नगराध्यक्षा राणीताई माने, विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख, उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजीराव बाबर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सीमा इंगवले, युवासेना तालुकाप्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे, विद्यार्थी संघटना जिल्हाप्रमुख प्रितेश दिघे, शिवसेना शहरप्रमुख समीर पाटील, शिवसेना विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेना पक्ष वाढीसाठी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यावर विचारविनिमय होणार आहे. त्यामुळे या बैठकीला सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !