सुदैवाने जीवित हानी नाही, मात्र रुग्णवाहिकेचा पूर्णपणे चक्काचूर
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे
वाई - आनेवाडी टोलनाक्यावर सातारा वरून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाचा ताबा सुटल्याने रुग्ण वाहीका दुभाजकाला धडकून मालट्रकला धडकून झालेल्या अपघातात रुग्णवाहीकेचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही .
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील दवाखान्यातील रुग्ण सातारा येथे सोडून माघारी पुण्याकडे निघालली रुग्णवाहिका क्रमांक MH12 9364 ही रुग्णवहीका सुमारे चार वाजता आनेवाडी टोल नाक्याजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती रुग्णवहीका दुभाजकाला धडकली तसेच शेजारील लेन वरून जात असलेल्या मालवाहतूक ट्रकला घासली, ट्रक चालकाने प्रसंग अवधान साधून जागेवर ट्रक उभा केला. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अपघात होऊन दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध उभी असल्यामुळे सातारा वरून पुणे कडे जाणारी वाहनांची कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या या अपघातात रुग्णवाहिका चालक संदीप हरिभाऊ शिंगाडे रा .पुणे हा किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने रुग्णवहीकेत कोणताही रुग्ण नसल्यामुळे खूप मोठी दुर्घटना टळली. यावेळी आनेवाडी टोल नाक्यावर कर्तव्य बजावत असणारे भुईज पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुशांत धुमाळ व त्यांचे सहकारी होमगार्ड कचरे तसेच आनेवाडी टोल नाक्यावरील कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेऊन अपघात ग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन. वाहतूक सुरळीत करून दिली.
आनेवाडी टोल नाक्याजवळ नेहमीच अपघात होत असतात. येथील स्थानिक नागरिक टोल नाका प्रशासन व पोलीस कर्मचारी याच्या तत्परते मुळे नेहमीच अपघातात जखमी झालेला लोकांना त्वरित मदत पुरवली जात असते. वेळेत मदत मिळाल्यामुळे अनेक जखमी लोकांचा जीव वाचला जातो.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा