दहिवाळ सोनार परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर दिनांक १ जुलै (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर येथील ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक श्री किरण वसंत सोनार (दहिवाळ) यांचे कनिष्ठ चिरंजीव अथर्व सोनार याचे वयाच्या अठराव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. तो बारावी मध्ये शिकत होता. पहिलीपासून ते बारावी पर्यंत शिकत असताना प्रत्येक इयत्तेमध्ये तो एक गुणी विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता त्यामुळे तो शिक्षकांनाही प्रिय होता. तसेच त्याचा मित्रपरिवारही मोठा आहे. अथर्व सोनार याच्या अचानक झालेल्या निधनामुळे दहिवाळ सोनार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पंढरपूर आणि परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, संस्कृतिक या व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील भाऊ व इतर असा मोठा परिवार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा