भयंकर पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाची उपाययोजना
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली - यंदा पाऊस चांगला झाला असला तरीही जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट असून तांड्या वाड्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे ,मात्र अद्याप जिल्ह्यात एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा केला नाही ,मात्र जिल्ह्यात ८२ गावात १०० खाजगी विहीर ,बोअरचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणी पातळी बऱ्या पैकी आहे. तरी देखील ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचे चटके बसू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने दरवर्षी प्रमाणे पाणी टंचाईचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार काही गावात पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्याने टँकर साठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत .परंतु अद्याप एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही.
हिंगोली तालुक्यातील बळसोंड ग्रामपंचायतने सहा टँकर मिळावेत यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यानुसार त्याना चार टँकरने गुरुवार पासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तसेच अंधारवाडी ग्रामपंचायतने दोन टँकर साठी प्रस्ताव दाखल केले होते ,त्यापैकी एक टँकर सुरू करण्यात आले. हिंगोली पंचायत समितीकडे १५ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी तीन प्रस्ताव रद्द करण्यात आले असून एकूण ११ प्रस्तावाना मान्यता देण्यात आली.
जून मध्ये पावसाने पाठ फिरविल्याने काही भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई जाणवू लागली आहे. अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. परिणामी भूजल पातळी खालावल्याने अनेक विहिरी व कुपणालिकेचे पाणी आटले आहे. यामुळे प्रशासनाने पाणी टंचाई भासू नये यासाठी ८२ गावात १०० विहीर, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा