बळसोंड ,अंधारवाडीला टँकर सुरू
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली - तालुक्यातील बळसोंड ,अंधार वाडीला पाणीटंचाई होत असल्याने शासनाने गुरुवार पासून टँकर सुरू केल्याने थोड्या फार प्रमाणात पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
दरम्यान, बळसोंड ,अंधारवाडीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा नळ योजना नसल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. दर वर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जाते, यावर्षी बळसोंड ग्रामपंचायतने सहा टँकरची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यापैकी चार टँकरने खाजगी पाणीपुरवठा सुरू केला आहे. तर अंधारवाडी ग्रामपंचायतने दोन टँकरचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता, प्रस्ताव मंजूर करून एका टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. पंचायत समितीचे मुकुंद कारेगावागर यांनी गुरुवार पासून खाजगी टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू केल्याने थोड्या प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळाला असून पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे.
बळसोंड भागात जल जीवन मिशनचे काम मागील एका वर्षांपासून सुरू आहे. मुदत संपली तरीही अद्याप पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली नाही. गुत्तेदारांच्या मनमानी कारभारामुळे पाणीपुरवठा योजना अद्यापही सुरू झाली नाही याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून पुढे येत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा