संस्थापक ,अध्यक्ष अन्सार शेख यांच्या मध्यमातून संघटनेची स्थापना
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि पत्रकरांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असणारी संघटना म्हणजे द् युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य. राज्यभर संघटनेचे जाळे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विखुरलेले आहे संस्थापक ,अध्यक्ष अन्सार शेख साहेब यांच्या मध्यमातून संघटनेची स्थापना करण्यात आली लावलेले रोपे आज राज्य भर माहाकाय वृक्ष झालेला आहे.
अशा या संघटनेच्या माध्यमातून द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार श्री अनिल करंदकर (पाटील) यांच्या कार्याची दखल घेत राज्य कार्यकारणी मध्ये राज्य कार्यध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली त्यांची काम करण्याची पध्दत काय वेगळीच असते गेली पांधरा वर्षे पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत समाज कार्याची आवड अन्याय विरुद्ध लढण्याची जिद्द सर्व सामान्य तळागाळातील माणसाला कसा न्याय मिळवून देता येईल याच्या कडे त्यांच नेहमी प्रामाणिक पणे लक्ष असते पत्रकांराच्या न्याय हक्का साठी सातत्याने त्यांची तळमळ आणि आत्मीयता या मध्यमातून दिसून येते.
तळागाळातील पत्रकांरा पर्यंत पोचण्याची जिद्द आणि न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड या कार्यातून दिसून येते पत्रकारांच्या न्याय हक्का साठी उदयास आलेली ही संघटना अन्सार शेख साहेब यांच्या माध्यमातून आज राज्यभर कार्यरत आहे या संघटनेच्या माध्यमातून राज्यतून प्रत्येक जिल्ह्यातून आणि तालुक्यातून जवळपास साडेतीन हजार पत्रकार बांधव जेडलेले आहेत आणि कार्यरत आहेत संघटना स्थापन होऊन फक्त एकच वर्षे झालेल आहे या वर्षेभरात लावलेले रोपाचे आज माहाकाय वृक्षाचे रुपांतर झालेल आहे या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य पत्रकारांना मिळणारा मान ,सन्मान ,न्याय, आडीआडचण या साठी सदैव तत्पर आणि वेळोवेळी पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन असणारी एकमेव राज्यातील संघटनेचा उल्लेख करावा अशी संघटना म्हणजे द् युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य होय.
द युवा ग्रामीण पत्रकार संघटनाग्रामीण पत्रकार संघटनेची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातून करण्यात आली. ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, प्रदेश कार्याध्यक्ष श्याम कांबळे यांनी केली. युवा ग्रामीण भागात पत्रकारांना येणाऱ्या अडीअडचणी त्याचबरोबर ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय हक्कासाठी झिजावे लागणारे उंबरठे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पत्रकारांना कायदेशीर मार्गदर्शन व पत्रकार एकजूट मधून मिळणाऱ्या न्याय हक्कासाठी व पत्रकारांचे प्रश्न प्रशासन दरबारी मांडण्यासाठी त्याचबरोबर ज्या मृत पत्रकारांच्या कुटुंबाना आत्मनिर्भर तसेच त्यांना स्वावलंबी बनवून आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी संघटनेने विवध धोरण आखले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा