maharashtra day, workers day, shivshahi news,

रेती माफियांचा तलाठ्यांना ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न

अखेर पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या
Sand mafia tried to kill Talathis by crushing them under tractors, sindkhedraja, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा  तालुक्यातील निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रात दोन महिन्यांपूर्वी अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकातील तलाठी यशवंत घरजाळे व विष्णू थोरात हे कारवाईसाठी गेले असता, त्यांच्या अंगावर ४० ते ४५ आरोपींनी ट्रॅक्टर घालून जीवे ठार मारण्यांचा प्रयत्न केला होता. या घटनेने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. यातील दोन आरोपींना आज (दि.२५) किनगावराजा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. शेख अलीम शेख असिफ (वय ३१) व विनोद शामराव खरात (वय ३९) अशी या आरोपींची नावे आहेत.
सविस्तर असे, की दि. २६ मार्चरोजी सायंकाळी साडेसहा वाजेदरम्यान निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रातून रेती उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने महसूल पथकातील कर्मचारी यशवंत घरजाळे व विष्णू थोरात हे दोघे तलाठी नदीपात्रात रेतीचोरी करणार्‍यांवर कार्यवाही करण्याकरिता गेले होते. यावेळी अंदाजे ४० ते ४५ इसम चार ट्रॅक्टरमध्ये रेती भरताना दिसले. यावेळी मोबाईलमध्ये शूटिंग घेतली व चारही ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी हे कर्मचारी गेले असता सर्व ४० ते ४५ मजूर पळून गेले, परंतु थोड्याच वेळात अंदाजे ४० ते ४५ जण जप्त केलेल्या ट्रॅक्टरजवळ परत आले व त्यातील काही मजुरांच्या हातात रेती भरण्याची फावडे होते. ट्रॅक्टर चालकांनी पथकातील कर्मचारी यशवंत घरजाळे व विष्णू थोरात यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच ट्रॅक्टरचा पाठलाग केल्यास तुम्हाला जीवानिशी ठार मारू, अशी धमकी दिली. यावेळी या दोघा तलाठ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडण्याचाही प्रयत्न झाला. परंतु, तत्कालीन तहसीलदार सचिन जैस्वाल हे तातडीने घटनास्थळी आल्याने हे दोघे बचावले, तर आरोपी हे पळून गेले. 
या घटनेप्रकरणी ४० ते ४५ आरोपी विरूद्ध तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी आज किनगावराजाचे ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शेख अलीम शेख असिफ वय ३१, आरोपी विनोद शामराव खरात वय ३९ राहणार डिग्रस बुद्रूक, ता. देऊळगावराजा या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज राठोड हे करित आहेत.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !