100% निकालाची परंपरा कायम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
SSC बोर्डाच्या परीक्षेत सलग 8 व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखत लिटल स्टेप च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये संकेत शिवानंद डोईफोडे याने 95.60% घेऊन प्रथम क्रमांक मिळावीला तर वल्लभ गणेश अन्सापुरे 92.40% व नीरज गणेश अन्सापुरे 91.80% गुण प्राप्त करत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय शाळेतील सर्व विद्यार्थी म्हणून विशेष प्रविण्या सह उत्तीर्ण झाले.
या सर्व गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार एज्युकेशन सोसायटी नायगाव च्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. आ. वसंतराव पाटील चव्हाण, संस्थेचे सचिव श्री रवींद्र पाटील चव्हाण, जि. प. चे माजी शिक्षण सभापती श्री संजय आप्पा बेळगे, जेष्ठ संचालक श्री केशवराव पाटील चव्हाण, श्री दत्ता पाटील इज्जतगावकर, श्री सूर्यकांत कोठाळे, श्री लक्ष्मण पा. जाधव मोकासदारेकर,संस्थेचे प्रा. कुणाल गारटे, प्रा. बालाजी शिंदे, प्रा. एन रविकुमार हे उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य व शिक्षकांनी देखील सर्व पालकांचे व गुणवंतांचा सन्मान करुन विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा