छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पाटील हुंबाड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
सध्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी पैशाची जुळवाजुळ करत बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर व किसान कृषी केंद्रावर गर्दी करत आहे तर कृषी सेवा केंद्र आणि किसान कृषी सेवा केंद्र चालक आपल्या मनमानी प्रमाणे जगाचा पोशिंद असलेल्या शेतकऱ्यांना मागितलेले बियाणे खते याचा अपूर्व साठा करून उपलब्ध नाहीत त्यामुळे पाहिजे असेल तर तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील असे शेतकऱ्यांना कृषी सेवा व किसान कृषी केंद्र चालक यांनी मनमानी कारभार चालू केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खत आणि बियाणे खरेदी करण्यासाठी जे कृषी सेवा केंद्र चालक यांच्याकडून चढत्या दराने विक्री केल्या जात आहे त्यामुळे छावा मराठा युवा महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रदीप पाटील हुंबाड यांनी जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे.
ज्या किसान कृषी सेवा केंद्र व कृषी सेवा केंद्र जे चढत्या दराने शेतकऱ्यांना बी बियाणे व खते विक्री करत आहेत अशा कृषी सेवा केंद्राचे तात्काळ प्रमाणे निलंबित करण्यात यावे असे आदेश आपण नांदेड जिल्हा कृषी अध्यक्ष यांना द्यावेत अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे अगोदरच शेतकरी राजा हा आर्थिक संकटात आहे त्यात अवकाळी पाऊस गारपीट आणि उत्पन्नात घट झाल्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा पेरणीच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडला आहे.
त्यामुळे शेतकरी राजा बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी उसनवारी पैसे घेणे व्याजाने पैसे काढून खत खरेदी करणे तसेच दाग दागिने गहाण ठेवून आपल्या काळी आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी राजा हा कृषी सेवा केंद्रावर बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी जात असतो पण त्यांच्याकडूनच शेतकऱ्यांना चढत्या दराने जर बियाणे आणि खते विकत असतील तर अशा कृषी सेवा केंद्राचे व किसान कृषी सेवा केंद्राचे प्रमाणे निलंबित करून जे चालक आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाभरात जे कृषी सेवा केंद्र आणि किसान कृषी सेवा केंद्र विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही उपस्थित प्रदिप पाटील हुंबाड छावा मराठा युवा महासंघ नांदेड जिल्हा अध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर संभाजी पवळे युवा जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील मोरे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षरी आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा