वैद्यकिय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
संजीवनी शिक्षण प्रसारक संस्था केळवद यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा वैद्यकिय क्षेत्रातला राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. निकिता मंडवाले यांना जाहीर झाला असून त्यांनी योग निसर्गोपचार तथा आयुर्वेदिक औषधीने उपचार करून अनेक पेशंट बरे केले आहेत त्यामुळे त्यांचा नावलौकिक बीड जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यात देखील पसरला आहे याची दखल घेऊन त्यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती संजीवनी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. निवृत्ती जाधव यांनी शिवशाही न्यूज सोबत बोलताना आज दिली आहे येत्या 6 मे रोजी संस्थेच्या समारंभात या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा