संपूर्ण गावावर पसरली शोककळा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
बिलोली तालुक्यातील अटकळी येथील अल्पभूधारक शेतकरी मारोती कोंडीबा भिंगे (४२) यांचा शेतातील इंधन विहिरीच्या विद्युत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला आहे.
अटकळी येथील अल्पभूधारक शेतकरी मारोती कोंडीबा भिंगे यांच्या नावे दिड एकर जमीन आहे. त्या जमिनीत एक इंधन विहीर (बोरवेल) आहे. ता .२५ रोजी सदरील शेतकरी आपल्या शेतात जाऊन इंधन विहिरीसाठी देण्यात आलेल्या महावितरण कंपनीकडून आलेल्या व विंधन विहिरीस विद्युत पुरवठा करणाऱ्या स्टार्टर जवळील जिवंत तारेला स्पर्श झाल्याने त्या जिवंत तारेचा जोराचा त्या शेतकऱ्यास विद्युत शॉक बसल्याने तो जागीच गतप्राण झाला.
ही बाब त्याच्या कुटुंबास कळल्यानंतर त्यांनी लगेच शेताकडे धाव घेत एकच हंबरडा फोडला. सदरची घटना रामतीर्थ पोलीस ठाण्याला कळल्यानंतर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे आदमपूर सर्कलचे पोलीस बीट जमादार डि.के. जांभळीकर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करीत मयत शेतकऱ्यांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी बिलोली उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
मयत शेतकऱ्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा,१ मुलगी असा परिवार आहे. शेतकरी कुटुंबातील घरचा कर्ता पुरुष गेल्याने संसार उघड्यावर पडले आहे. सदरील मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अपघात योजनेअंतर्गत आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा