गुणवत्तेत मात्र मुलींचेच वर्चस्व
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
भुईंज ता.वाई शिवसंकुल प्रतिष्ठान संचलित स्वराज्य ज्युनिअर कॉलेजचा यंदाचा बारावीचा सायन्स व कॉमर्स चा निकालशंभर टक्के लागला असून विविध स्तरातून स्वराज्य ज्युनिअर कॉलेजचे कौतुक आणिअभिनंदन होत आहे.
या कॉलेजची प्रथम आलेली विद्यार्थिनी अमृता लडकत हिला८०.३३, सायली कणसे ही स८०.३३, व वेदिका चिकणे हिस८०.३३ असे गुण मिळाले असून या तिन्ही ही मुलींनी प्रथम तीन क्रमांक मिळवले. सण २०२३/२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विज्ञान व वाणिज्य शाखेत स्वराज्य कॉलेजच्या विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.
या कॉलेजचे प्रा. धीरज सावंत यांचेसह प्रा.शामली शेलार, प्रा.नितीन शेवते, प्रा. प्रामनोज यादव, प्रा.विजय देवकाते, प्रा.तुषार वारागडे प्रा.कोमल पिसाळ, प्रा.पूजा इथापे, प्रा.अजय पातुकडे,प्रा तृप्ती चव्हाण, प्रा.शर्मिला वाराकडे, दीपक निकम व स्वराज्य कॉलेजच्या सर्व शिक्षक वर्ग यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळे कॉलेज हे यश संपादित करू शकले. स्वराज्य कॉलेजच्या इतर भरघोस यश मिळवलेला विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांचे कौतुक कॉलेजच्या वतीने करण्यात आले.
स्वराज्य कॉलेजच्या या भरघोस यशाबद्दल प्रा धीरज सावंत व त्यांच्या सर्व प्राध्यापक सहकाऱ्यांचे विविध स्तरातून विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा