स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळाच्यावतीने उपस्थित राहण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली: स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्ताने २६ ते २८ मे दरम्यानच्या कालावधीत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सावरकर प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
मागील काही वर्षापासून हिंगोली शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त २६ ते २७ मे दरम्यान हिंगोली शहरातील श्रीदत्त मंदीर प्रांगणात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. २६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ.निरज देव (जळगाव) यांचे माफीवीर? मान्यच! यावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचे प्रायोजक एम.डी.जोशी व श्री.दत्त मंदीर समिती स्नेह विकास कॉलनी शिवाजीनगर हिंगोली हे आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतिषराव विडोळकर यांची उपस्थिती राहणार आहे.
२७ मे सोमवार रोजी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथील अरूण भालेराव हे क्रांतीसूर्य दिंगत स्वातत्र्यंवीर सावरकर या विषयावर व्याख्यान करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक स्व.केशवराव दिंगबरराव घन यांच्या स्मृती प्रित्यर्थ हिंगोलीतील घन परीवार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा दक्षता आणि सनियंत्रण समिती सदस्य तथा जय विठ्ठल रूख्माई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था केंद्रा बु.येथील डॉ.रवी थोरात हे आहेत.
२८ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजता हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त प्रतिमा पूजन केले जाणार आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर रचित छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती होणार आहे. व्याख्यानमालेसह या कार्यक्रमात सावरकर प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ हिंगोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा