maharashtra day, workers day, shivshahi news,

हट्टा पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा डाव उधळला

संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांचा बक्षीस देऊन सत्कार 
ATM theft plan foiled, hingoli, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली -  जवळा बाजार परिसरात हट्टा पोलिस पेट्रोलिंग करीत असताना गुरुवारी मध्यरात्री  सव्वा एक वाजण्याच्या सुमारास बस स्थानकालगत एसबीआय बँकेच्या एटीएम चोरीचा डाव पोलिसांनी उधळून लावला.
मागील काही दिवसात एटीएम चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून एटीएम , बँक व सोने चांदीचे दुकान सुरक्षा बाबत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक  जी. श्रीधर यांनी सर्व ठाणेदारांना चोरीच्या घटनांना आळा घालण्याबाबत उपाययोजना संदर्भाने संदेश दिला होता.
तसेच अनेक प्रसार माध्यमाद्वारे सुद्धा हिंगोली जिल्ह्याच्या आजूबाजूला एटीएम चोरीचे घटना घडत असल्याबाबत व बँक अधिकारी तसेच सोनार दुकानदार  यांनी चोरीच्या घटनांना आळा घालण्याबाबत काय उपाययोजना करावी याबाबत बातमी दिली होती.
त्या अनुषंगाने  गुरुवारी मध्यरात्री  सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या नियंत्रणात पोलिस अमलदार प्रीतम चव्हाण व शेख मदार हे मोटार सायकलवर जवळा बाजार परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रात्री सव्वा एक वाजण्याचे सुमारास जवळा बाजार बस स्थानकालगत एसबीआय बँकेच्या एटीएम जवळ एक एपी-२३  पासिंग चे संशयित बोलेरो पिकअप उभे असल्याचे व त्यामध्ये चार-पाच लोक असल्याचे दिसले.
त्या अनुषंगाने पोलिसांना सदर पिकअप बाबत चौकशी करण्यासाठी जवळ जात असतानाच  बोलेरो 
पिकअप अति वेगाने नागेशवाडीकडे निघून गेले, पोलिस अंमलदारांनी त्याचा पाठलाग केला परंतु संशयीत बोलेरो पिकअप अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
पेट्रोलिंग करून एटीएम चोरीचा डाव उधळून लावल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक  जी. श्रीधर यांनी  हट्टा पोलीस स्टेशनचे ठाणेदार  गजानन बोराटे, पोलिस अमलदार प्रीतम चव्हाण, शेख मदार यांना प्रशस्तीपत्र व  बक्षीस दिले आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !