अल्पसंख्याक मेळाव्यात महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी घेतली सेल्फी
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन (प्रतिनिधी मजहर खान पठाण)
जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरांमध्ये अल्पसंख्यांक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये उपस्थित मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना दानवे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे तसेच एक गोष्ट आवर्जून उपस्थित मुस्लिम बांधवांना सांगितले आहे की मांगी मी 40 वर्षापासून मुस्लिम बांधवांची प्रत्येक कार्यात धर्मात सर्व मदत करतात.
माझ्या राजकीय प्रवासात मी मुस्लिम बांधवांना नगरपरिषद, पंचायत समितीत, बाजार समितीत, कारखान्यात, शैक्षणिक संस्थेत पद व नोकरी दिली. भोकरदन, जाफराबाद, अंबड, जालना लोकसभा मतदारसंघात ईदगाहसाठी कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. एवढेच नाही तर मुस्लीम बांधवांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून घरकूल वाटप, राशन, कामगारांना किटसह विविध योजना दिल्या. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस केवळ मुस्लिम बांधवांचा मतदानासाठी वापर केला, कोणतेही काम केलेच नाही, मतदारसंघात १२ वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती परंतु त्यांनी मतदानापुरताच वापर केला व तुमच्यामध्ये गैरहजर व भुलथापा मारून भाजपबद्दल भिती निर्माण केली. आगामी काळात मतदारसंघाचा विकासासाठी १३ मे ला मतदान करा असे आवाहन दानवे यांनी केले. याप्रसंगी शहर व परिसरातील भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने मुस्लीमबांधव उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा