दारू, मटका, गुटखा, जुगार, क्लबचा सुळसुळाट
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजा तालुक्यात दुसरबीड हे गाव मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते त्यामुळे आजूबाजूच्या बऱ्याच खेड्यातील लोकांची येथे ये- जा असते बरीच खेडी ही दुसरबीड शहरावर कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी अवलंबून आहे त्यामुळे अवैध धंदे वाल्यांनी इथे हैदोस घातला आहे येथे सर्रासपणे दारू विकली जाते मटका व क्लब चालविला जातो आणि गुटख्याचा व्यापार देखील केला जातो या सर्व गोष्टींना आळा बसावा या साठी शिवशाही न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार प्रतिक सोनपसारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन दिले आहे आता याची दखल पोलिस प्रशासन कशा प्रकारे घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा