सातारा शहर डी. बी. कारवाई
मा. पोलीस अधिक्षक साो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले यांनी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंघाने सातारा जिल्हा हद्दीत अंमली पदार्थाचे विक्री करणारे लोकांचेवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
दि. २०/०५/२०२४ रोजी सातारा शहरामध्ये गांजा विक्री करण्यासाठी सातारा शहरातून तडीपार करण्यात आलेला एक इसम येणार असल्याची गोपनीय माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के यांना गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त झाल्याने त्यांनी लागलीच सातारा शहर डी.बी. पथकास मार्गदर्शन करून सदर युवकाचा शोध घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाणेचे अधिकारी व डी.बी. स्टाफ असे सदरबझार परिसरामध्ये मिळाले माहितीप्रमाणे सदर इसमाचा शोध घेत असताना सदरचा इसम हा सदरबझार येथील एका बंद कंपनीचे गोडावूनचे परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर परिसरात पोलीस स्टाफ ठिकठिकाणी थांबून होता. सायंकाळी १६:४५ वा. सुमारास सदरचा तडीपार इसम हा हातामध्ये पांढ-या रंगाची पिशवी घेवून बंद पडलेल्या कंपनीचे झाडी झुडपाचा आडोसा घेवून चालत येत असताना दिसून येताच पोलीसांची त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडील असणा-या पांढ-या पिशवीमध्ये गांजा असल्याने समजून आले व त्याने तो विक्री करण्यासाठी आणला असल्याचे त्याने सांगितले. सदरचा गांजा हा एकूण २.१८० कि.ग्रॅ. वजनाचा व ७५,०००/- रुपये किंमतीचा असून तो पोलीसांनी जप्त करून ताब्यात घेतला असून सदर इसमावर एन.डी.पी.एस. कायदयानुसार कारवाई करून त्यास अटक केली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो. हवा. श्रीनिवास देशमुख, राहूल घाडगे, सुजीत भोसले, निलेश जाधव, पो.ना. पंकज मोहिते, संतोष शेलार, विक्रम माने, पो. कॉ. इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी केलेली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा