नाम फाउंडेशन टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासनाचा संयुक्त उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पळवे खुर्द येथील शुक्रवारी नाम फाउंडेशन च्या मोलाच्या सहकार्याने भेटलेल्या पोकलेन मशीन ने जलसंधारणाच्या काम पूर्ण करून शेवट केला आणि मशीन दुसऱ्या गावाला रवाना झाले.
खरेतर 8 मार्चला सुरू झालेले हे काम जवळपास 12 मे पर्यंत म्हणजे जवळपास दोन महिने आणि काही दिवस हे काम सुरू होते ह्या मध्ये आपल्याला 520 तास डिझेल सह तलावातील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशन टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासन यांनी केले आणि नंतर आपण सर्वांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून जवळ जवळ 1 महिना मशिनला डिझेल टाकून राहिलेले काम पूर्ण करून घेतले अजूनही काही ओढे खोलीकरण करण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो तशी लोकवर्गणी ही आपण जमा करत होतो पण वेळेअभावी काही काम बाकी राहिले हे काम पूर्ण करण्यासाठी आपण येत्या काळात परत मशीन मिळावा ह्यासाठी प्रयत्नशील आहोत.
बारगळमळा तलावासंदर्भात आपण पाठपुरावा करून जवळपास १५ दिवसाची प्र मा आपण मिळवली होती व काम वाढवून भेटलेही होते पण ऐनवेळी आलेल्या पावसामुळे तलावातील मातीचा पूर्ण चिखल झाल्यामुळे हे काम आपण पुढील वर्षी परत प्र. मा घेवून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच अजून काही 2-3 ओढ्यांचे काम करणे गरजेचे आहे ते काम बाजूच्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून काम आपण नाम फाउंडेशन च्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत त्यासाठी आता पासूनच आपण नाम फाउंडेशन सोबत पत्र व्यवहार सुरू केला आहे.
या दोन महिन्यात आपण शेळकेमळा तलाव बारगळ मळा तलाव ह्या दोन तलावातील गाळ काढण्याचे काम अतिशय सुंदर रित्या पूर्ण केले. ह्यानंतर आपण शेळकेमळा तलावाचा सांडवा ते 1 नंबर केटी पर्यंतच्या ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम सुरू करून पूर्ण केले त्यानंतर गवळी नाला शिंदे मळा ते गवळी पुल ह्याही ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण काम पूर्ण केले नंतर साईनाथ बाबा येथील एक नाला तसेच तसेच मांयदळा डोंगरा जवळील नाल्याचे व ओढयाचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम केले. नंतर शेलारमला येथील नाला व ओढा खोलीकरण पूर्ण करून शेलार मळा ते पाचारने वस्ती पर्यंत ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे डोळे भरून पाहण्यासारखे काम पूर्ण केले.खरतर हे काम मोबाईल मधील व्हिडिओ किंवा फोटोच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत होतो पण खरे काम किती व कसे झाले हे जागेवर जाऊन पाहिल्यावरच समजते आणि आमची सर्वांना मनापासून विनंती आहे की एकदा जागेवर जावून काम नक्की पाहा.
या कामाचा फायदा आपल्याला पुढील काळात दिसणार आहेच पण आम्ही खात्री देवून सांगतो की हे काम आपल्या गावांसाठी नवसंजीवनी देणारे असेल यात कसलीही शंका नाही निसर्गाने साथ दिल्यास आपल्या गावामध्ये कमीत कमी तिप्पट पाणीसाठा हा साठवण स्वरूपात वाढणार असून भूगर्भातील पाणीसाठा ही भरपूर प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे.
आपण या पहिल्याच वर्षी नाम फाउंडेशन बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत पुढील वर्षीच्या कामासाठी पळवे गावाला नाम फाउंडेशन च्या वतीने प्राधान्यक्रम कसा दिला जाईल याची काळजीही आपण घेतली असून पुढील वर्षी अजून मोठे काम करण्याचा सर्वांच्या सहकार्याने आपला मानस आहे. तसेच आपण वृक्षरोपणाची मोहिमही ह्या पावसाळ्यात राबवणार असून ह्यासाठी सर्वांचे सहकार्य आमच्यासाठी मोलाचे राहील.
ह्या तलाव व ओढे खोलीकरण रुंदीकरण कामासाठी ज्यांनी ज्यांनी कळत नकळत आपले मोलाचे सहकार्य व मदत व लोकवर्गणी देवून मदत केली अशा सर्व ग्रामस्थांचं शेतकऱ्यांचे आभार मानण्यात आले. हे काम ज्यांनी आपल्याला दिले अशा नाम फाउंडेशन , टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासन यांचेही आम्ही ऋणी राहू. असे पळवे खुर्द चे ग्रामस्थ म्हणाले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा