जुगार खेळणाऱ्या 29 जणांना रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल, 2 लाख 22 हजार 300 मुद्देमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
गेली कित्येक महिने मरवडे रोडवर खुलेआम चालणाऱ्या दोन जुगार अड्ड्यावर आयपीएस अधिकारी शुभम कुमार यांच्या पथकाने धाड टाकली असून जुगार खेळताना 29 जणांना रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी 1) शंकर शिवाजी देवकर (वय 60 वर्षे, रा. किल्लाभाग मंगळवेढा) 2) सुभाष मल्लु होवाळे (वय 47 वर्षे रा. माडग्याळ ता जत) 3) नवनाथ सदाशिव कांबळे (वय 47 वर्षे रा. बेगमपुर ता मोहोळ) 4) रमेश उर्फ नामदेव अनुसे (वय 33 वर्षे, रा. कमलापुर ता सांगोला) 5) विकास जालिंधर मासाळ (वय 42 वर्षे, रा. मरवडे) 6) राजेंद्र लक्ष्मण वाकडे (वय 45 वर्षे), 7) विष्णु मुरलीधर वाकडे (दोघे रा. खंडोबागल्ली), 8) संदेश नागेश लोखंडे (वय 26 वर्षे, रा. भिमनगर मंगळवेढा) 9) योगेश अशोक पाटील (रा. किल्लाभाग मंगळवेढा) 10) जेटलिन धोंडाप्पा कोरे (वय 34 वर्षे, माडग्याळ ता जत) 11) नवनाथ शिवाजी दंडवते (वय 34 वर्षे, रा. शनिवारपेठ मंगळवेढा) 12) निखिल बाळासो कोळी (वय 30 वर्षे), 13) अनिल सिद्धेश्वर डांगे (वय 40 वर्षे, रा. बोराळेवेस मंगळवेढा), 14) सतिश सदाशिव पाटील (वय 40 वर्षे, रा.खवे ता. मंगळवेढ 15) प्रविण मलकप्पा बुरकुल (वय 43 वर्षे रा.शनिवार पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई शनिवार दि.18 मे रोजी 5 च्या सुमारास मंगळवेढा ते मरवडे जाणारे रोडलगत असलेल्या ताड पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये केली. या कारवाईमुळे मंगळवेढा शहर व परिसरात बेकायदेशीर चोकारांना चालणाऱ्यांचे चांगले सुधारित जाणले आहेत याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गजानन माळी यांनी फिर्यादी दिली आहे.
तर दुसऱ्या घटनेत भालेवाडी शिवारातील तळसंगी फाटा येथील स्वराज्य ढाब्याच्या पाठीमागील खोलीत गेलो असता सदर खोलीत 13 लोक गोलाकार बसलेले दिसले. त्यांचे मधोमध पत्याची पाने व रोख रक्कम तसेच हातामध्ये काही पत्याची पाने घेवुन ते तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसुन आले. त्यांना जागीच पकडले.
1) समाधान हणमंत बंडगर (वय 32 वर्षे, रा. बावची ता. मंगळवेढा), (2) सिध्देश्वर भिवा कोकरे वय 45 वर्षे रा.ब्रम्हपूरी), 3) तानाजी मारूती खंदारे (वय 63 वर्षे रा. साठेनगर), 4) ओजय शिंदे (ता.मंगळवेढा), 5) हरीदास उत्तन भोसले (वय 43 वर्षे रा.सरकोली ता.पंढरपूर), 6) धनंजय बाळकृष्ण पवार (वय 35 वर्षे रा. राहटेवाडी), 7) रावसाहेब पांडुरंग साठे (वय 35 वर्षे रा. बठाण), 8) गणेश सुभाष चव्हाण (वय 33 वर्षे रा.बेगमपूर ता. मोहोळ), 9) तानाजी श्रावण लांडगे (वय 35 वर्षे रा.घेरडी ता. सांगोला), 10) बापू मनोहर जाधव (वय 50 वर्षे रा. अंबे ता.पंढरपूर), 11) प्रकाश महादेव कोळेकर (वय 53 वर्षे रा.मुंढवी ता.मंगळवेढा), 12) दयानंद विठठल काळे (वय 35 वर्षे रा.खोमनाळ ता. मंगळवेढा), 13) चिंदानंद निगाप्पा मैंदर्गी (वय 42 वर्षे रा. भंडारकवठे ता.दक्षिण सोलापूर) असे असल्याचे सांगितले आयपीएस अधिकारी शुभम कुमार (परिविक्षाधीन भा.पो.से.) यांना गोपनीय बातमीदारामार्फत फटेवाडी ता. मंगळवेढा येथील मंगळवेढा ते मरवडे जाणारे रोडलगत असलेल्या ताड पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये बंद रूममध्ये काही इसम जुगार खेळत आहेत. अशी माहीती मिळाली होती.
शनिवार दि.18 मे रोजी 5 च्या सुमारास फटेवाडी ता. मंगळवेढा येथील मंगळवेढा ते मरवडे जाणारे रोडलगत असलेल्या ताड पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये बंद रूममध्ये चालणा-या जुगार आडयावर छापा मारला असता 1 लाख 90 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील आरोपी हे तेथे गोलाकार बसुन पैशाची पैज लावुन तिरट नावाचा जुगार खेळत असताना मिळुन आले आहेत तसेच जुगार आडडा मालक आरोपी अनिल सिद्धेश्वर डांगे हा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई आयपीएस अधिकारी शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों / 353 उबाळे, पोहेकॉ/1635 शेख, पोहेकॉ/148 मोरे, पोहेकॉ/796 आवटे नेमणुक पंढरपूर तालुका पोलीस ठाणे पोकॉ/1355 राठोड, चापोकाँ/51 चाटे नेम- पोलीस मुख्यालय आदींनी केली आहे.
दुसऱ्या घटनेत पकडलेल्या इसमांकडे सदर जुगार आड्डा मालकाबाबत विचारपूस चौकशी करता त्यांनी जुगार आडड़ा चांगदेव एकनाथ फराटे (रा.भालेवाडी ता. मंगळवेढा) हे असल्याचे सांगितले. जुगार साहित्य, मोबाईल व रोख रक्कम असा 2 लाख 22 हजार 300 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा