आमदार असताना खडकपूर्णा नदीच्या पुलाचे काम केले होते मंजूर
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
डॉ शशिकांत खेडेकर आमदार असताना लिंगा- देवखेड या दोन गावांना जोडणाऱ्या खडकपूर्णा नदीच्या पुलाचे काम त्यांनी मंजूर करून घेतले होते पण मध्यंतरी संबंधित ठेकेदार यांच्या अडचणीमुळे हे काम रखडले होते त्यानंतर १४ मार्च २०२२ रोजी शिवसेना नेते गजेंद्र देशमुख, शरद कुडे, गणेश कास्तोडे,शुभम पव्हरे, सौ. रेवती आढाव यांनी खडकपुर्णा नदीपात्रात उपोषण केले होते.
त्यावेळी डॉ.खेडेकर यांच्या मध्यस्थीने हे उपोषण मागे घेतले होते तरीही कामात ठेकेदार यांच्या बिलामुळे अडचणी आल्या होत्या मात्र आता डॉ खेडेकरांनी परत पाठपुरावा करत सदरील पुलाचे काम सुरू करून घेतले आहे त्यामुळे दोन्ही गावांना जोडणारा पुल लवकरच तयार होण्याचे चिन्ह दिसत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा