श्रीराम जन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्ष कैलास पाटील शिंदे यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगांव शहरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक 26 मे 2024 रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा व भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची अकरा वर्षाची परंपरा आहे शोभा यात्रेतील मुख्य आकर्षक भव्य श्री राम मूर्ती श्री हनुमान मूर्ती महादेव नंदी बाहुबली हनुमान महाकाल महादेव छत्री लाइटिंग अघोरी असे देखावे असणार आहेत या शोभायात्रेच्या मार्गावर जागोजागी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जागोजागी मठ्याचं वाटप खिचडी वाटप व्यवस्था करण्यात येणार आहे.
यात पारंपारिक पद्धतीची भजनी आपले वस्त्र परिधान करून गोसावी वासुदेव साधू संत महंत किर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी यासह हजारो राम भक्त शोभायात्रेत सहभागी राहणार आहेत शोभायात्रीची सुरुवात राजुरा हनुमान मंदिरात हनुमंतराचा अभिषेक पूजा आरती करून शोभायात्रेला सुरुवात होईल ही शोभायात्रा श्रीराम मंदिर येथे आरती नंतर संपन्न होईल भव्य महाप्रसादाचे दिवसभर आयोजन राहणार आहे तरी या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष कैलास पाटील शिंदे व श्रीराम जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा