लक्ष्मणराव काळे व विजय वरकड यांनी केले मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
पेंडेफळ येथे बाळू जगधने यांचे कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्राच्या उद्घाटनाला खुलताबाद तालुक्यातील पवन ऍग्रो कंपनीचे संचालक लक्ष्मणराव काळे , खिर्डी येथील प्रगतिशील शेतकरी विजय वरकड, सफियाबाद वाडी येथील प्रगतिशील शेतकरी कडू भाऊ जाधव, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट ) उपजिल्हाप्रमुख संजय निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे निमित्ताने लक्ष्मणराव काळे यांनी आद्रक पिकाबद्दल सविस्तर अशी शेतकऱ्यांना माहिती दिली तर विजय वरकड यांनी मातीचा सेंद्रिय कर्ब, बांधावरील फळझाडे, गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत याबद्दल माहिती दिली कडू भाऊ जाधव यांनी याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी,गावातील शेतकरी,नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा