नगरपरिषदेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत शिवशाही न्यूजने केला होता पाठपुरावा
हिंगोली शहरातील खुराणा पेट्रोल पंप जवळ मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत होती. त्यामुळे शिवशाही न्यूजने स्वच्छतेच्या बाबतीत नगरपरिषदेची उदासीनता, खरमरीत बातमी लावून चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर मात्र नगर परिषदेला जाग आली असून जेसीबीच्या साह्याने कचरा हटवण्याचे काम सुरू केले आहे.
शिवशाही न्यूज - बातमी जी परिणाम दाखवतेहिंगोली जवाहर रोड समोर पार्किंगच्या ठिकाणी कचरा टाकण्यात आला होता. शिवशाही न्यूजने बातमी प्रकाशित करताच नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कचरा हटवला आहे आणि पार्किंगच्या ठिकाणी अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, कचरा टाकल्यास नगर परिषदेकडून कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या असल्याचे नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी शिवशाही न्यूजला सांगितले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा