गाठीभेटी, कोपरा बैठकीच्या माध्यमातून मतदारांपुढे मांडली भूमिका
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
शिवसेना- भाजपा- राष्ट्रवादी- काँग्रेस- मनसे -आरपीआय- पीपल्स रिपब्लिकन पक्ष - प्रहार संघटना महायुतीचे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार संदिपान भुमरे साहेब यांच्या प्रचारार्थ वैजापूर तालुक्यातील अंचलगाव, बिरोळा, जिरी, मनोली, कविटखेडा, वळण, लोणी, टुणकी, दसकुली व बळ्हेगाव या गावात जाऊन प्रखर ऊन न बघता मतदान जनजागृती केली. तेथील ग्रामस्थांशी मागील कार्याचा लेखाजोखा वाचून दाखविला. कार्यकर्त्यांनी 13 मे रोजी धनुष्यबाणाला मतदान करून उमेदवार संदिपान भुमरे साहेब यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
या बैठकीला भागिनाथ मगर, बाळा भोसले, मार्केट कमिटी संचालक गोरख पाटील, आनंद सर निकम, ज्ञानेश्वर तुरकणे, प्रहार युवा तालुकाप्रमुख दत्ता सोनवणे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके, विभाग प्रमुख अंबादास मामा खोसे, माऊली, निवृत्ती आप्पा, बाळू सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, साखरे आप्पा, समाधान सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, अनिकेत सूर्यवंशी, नारायण सूर्यवंशी, संतोष दिवेकर, बाळासाहेब सूर्यवंशी, मच्छिंद्र सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, आबा सूर्यवंशी,साहेबराव सूर्यवंशी, रामहरी सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी,रावसाहेब सूर्यवंशी व वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी त्यांची सर्वांची उपस्थिती होती. नंतर कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा