maharashtra day, workers day, shivshahi news,

कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम याची वाई येथे कृषि प्रक्रिया उद्योगास भेट

ड्राय फ्रोजन पदार्थांविषयी घेतली माहिती
Agriculture Commissioner Dr. Praveen Gedam  Visit to Agricultural Processing Industry, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथे महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर सातारा जिल्ह्यास भेट दिली. सदर भेटी दरम्यान त्यांनी वाई एम. आय. डी. सी. येथील ऑर्चर्ड ब्रँड प्रा. लि. या कृषि प्रक्रिया उद्योगास भेट दिली. कंपनीचे व्यवस्थापक ऋषिकेश शिंदे यांनी फळे व भाजीपाला यांच्यावर थंड निर्वात प्रक्रिया केली जात असुन फळांचे व भाजीपाल्याचे मुळगुणधर्म व जीवनसत्व कायम राहुन सर्व फळपिकांच्या ड्राय फ्रोजन केलेल्या पदार्थांविषयी माहिती सांगितली तसेच अशा हलक्या व गुणवत्तापुर्ण उत्पादित प्रक्रिया पदार्थास आईस्क्रीम, शितपेय, हवाई प्रवास चॉकलेट, रेल्वे कॅन्टिन व हॉटेल्स मध्ये मागणी व निर्यातीस वाव असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांच्या गुणवत्ता पुर्ण शेतमालास उच्चतम बाजार पेठ मिळण्याची संधी अशा प्रक्रिया उद्योगाने निर्माण होवुन. त्यातुन मिळणाऱ्या नफ्याचे व रोजगाराचे प्रमाण मोठे असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होईल असे महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. व शेतकरी बांधव व कृषि विभाग यांना खरीप हंगाम यशस्वीतेच्या शुभेच्छा दिल्या.
भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा यांनी हळद पिकाच्या गुणवत्तापुर्ण नमुन्यांची व विविध वानांची माहिती दिली. व सातारा जिल्हयातील विविध कृषि प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती सांगितली. सदर भेटी दरम्यान प्रशांत शेंडे, तालुका कृषि अधिकारी, वाई यांनी तालुक्यामध्ये होत असलेल्या पिकांची व कृषि प्रक्रिया व हळद उद्योगाविषयी माहिती सांगितली.
सातारा जिल्ह्यातील सर्व भेटींचे नियोजन हे बसवराज बिराजदार विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर भेटी दरम्यान बसवराज बिराजदार विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर, भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा, विकास बंडगर प्रकल्प संचालक आत्मा, सातारा, फिरोज शेख, जिल्हा नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प, प्रशांत शेंडे, तालुका कृषि अधिकारी, वाई व वाई तालुक्यातील सर्व कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी वाई व मेणवली, तसेच कृषि पर्यवेक्षक वाई, कृषि सहाय्यक व आत्मा बी. टी. एम. व ए.टी.एम. हे उपस्थित होते.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !