पोलिसांच्या चमकदार कामगिरीमुळे वाईकर नागरिक समाधानी
शिवशाही वृत्तसेवा, वाई तालुका प्रतिनिधी शुभम कोदे.
वाई पोलीस ठाणे गु.र.नं ११०/२०२४ भा.द.वि.सं. ४५४,४५७,३८० प्रमाणे दिनांक ०१/०५/२०२४ रोजी अज्ञात इसमाविरुध्द सरकारमान्य देशी दारुच्या दुकानात चोरी करण्याबाबत बाई पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सरकारमान्य देशी दारुच्या दुकानात चोरी करणारा इसम हा गुरेबाजार झोपडपट्टी येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या खास बातमीदारांमार्फत प्राप्त झाल्याने त्यांनी वाई पोलीस ठाण्याच्या तपासपथकातील अधिकारी अंमलदार यांस सदर सराईत आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सुचित केल्याने तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी वाईमधील गुरेबाजार झोपडपट्टी येथे सापळा रचुन सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार असणारा सराईत गुन्हेगार सारंग ज्ञोनश्वर माने रा गुरेबाजार झोपडपट्टी वाई यांस ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदरच्या गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरच्या सरकारमान्य देशी दारुच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिल्याने गुरेबाजार झोपडपट्टी मधील त्याचे राहते.
घराची दोन पंचासमक्ष डाडती घेतली असता, ४८,०००/-रुपये किमतीचे १५ देशी दारुचे बॉक्स तेथुन हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो श्रीमती आंचल दलाल मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे वैभव पवार सहा पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो. हवा अजित जाधव, उमेश गहीण, पो.ना धिरज कुमार, राहुल भोईर पो.शि प्रसाद दुदुस्कर, राम कोळी, हेमंत शिंदे, नितीन कदम, आश्रवण राठोड, धिरज नेवसे विशाल शिंदे, गोरख दाभाडे यांनी केली आहे. मा. पोलीस अधिक्षक सोो श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो श्रीमती आंचल दलाल मॅडम यांनी वाई तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा