जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - येथील साधना हेंबाडे पाटील यांची जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांच्या हस्ते नांदेड येथील कार्यकारणी च्या बैठकीत देण्यात आले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय संघटक सुनीता मुळे तसेच प्रदेश सहसंघटक डॉ. शितल कल्याणकर व राज्य कार्यकारणी सदस्यां उपस्थित होत्या. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे ज्योती कोथळकर, कांताबाई कल्याणकर, सीमा मगर, राजश्री क्षीरसागर, सरस्वती कोरडे, जया पवार, अरुणा अंभोरे, तेजस्विनी टाकलगव्हाणकर,अरुणा ठाकरे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा