सोलर लाईट स्टॅन्ड व फ्लेक्सिबल स्प्रिंग पोस्ट बॅरियर लावल्याने नक्कीच अक्सिडेंटचे प्रमाण कमी होईल.
शिवशाही न्यूज वृत्तसेवा ( पुणे जिल्हा -प्रतिनिधी अभिषेक जाधव )
पुणे दि 1 :- कुंजीरवाडी ग्रामपंचायत वतीने उड्डाण पुलावर कठडे असल्याने त्या कठड्याला धडकून अक्सिडेंट होत असतात, अनेक अक्सिडेंट होऊन अनेकांचे प्राण गमवावे लागले आहेत. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना पुलावरील कठडे दिसण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने रेल्वे पुलावर सोलर लाईट स्टॅन्ड व फ्लेक्सिबल स्प्रिंग पोस्ट बॅरियर बसवण्यात आले.
सोलर लाईट स्टॅन्ड हे सौरऊर्जेचा वापर करून आपोआप चार्ज होऊन रात्रीच्या अंधारात चमकत राहतात. फ्लेक्सिबल स्प्रिंग पोस्ट बॅरियर हे वाहनचालकाचे लक्ष वेधून घेते व दिशा दर्शक सूचना देण्याचे काम करते.
सोलर लाईट स्टॅन्ड व फ्लेक्सिबल स्प्रिंग पोस्ट बॅरियर लावल्याने नक्कीच अक्सिडेंटचे प्रमाण कमी होईल. वाहन चालकांना पुलावर बसवलेल्या लाईट चमकल्याने योग्य दिशादर्शक सूचना मिळतील व वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही. अशा या संवेदनशील कामांसाठी ग्रामपंचायत प्रशासन कायम अग्रही राहून काम करत राहील. कुंजीरवाडी सरपंच श्री हरीश गोटे सर यांनी माहिती दिली आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा