maharashtra day, workers day, shivshahi news,

वाईच्या धोमबलकवडी कालव्यात आसरे आंबेदरावाडीतील पिता पुत्राचा बुडुन मृत्यू

वाईच्या पश्चिम भागातील गावांनवर शोककळा पसरली आहे
Father and son drowned in Dhombalkawadi canal , Mourning in villages in the western part of Wai ,satara ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा,वाई तालुका  प्रतिनिधी , शुभम कोदे.
वाईच्या पश्चिम भागातील आसरे आंबेदरवाडीचे रहिवासी असलेले  पिता पुत्राचा धोम बलकवडी धरणाच्या कालव्यात पोहण्या साठी गेले असता दोघांचाही बुडुन मृत्यू झाल्याने आसरे आंबेदरवाडीसह   वाईच्या पश्चिम भागातील गावांनवर शोककळा पसरली आहे .
या गंभीर घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलिस पाटील गणेश जरांडे आणि सचिन सणस यांच्या मार्फत समजताच त्यांनी या गंभीर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिस उपनिरिक्षक सुधीर वाळुंज नितीन कदम उमेश गहिण उध्दव पिसाळ यांचे पोलिस पथक तयार करुन तातडीने घटना स्थळावर पाठवले होते .पण रात्रीचे ३ वाजलेले होते आणी भरपूर अंधार असल्याने शोध घेणे अवघड असल्याने हे पथक माघारी वाईला आले .
पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे यांनी या पिता पुत्राचा शोध गतीने घेण्यासाठी महाबळेश्वर ट्रॅकर्सचे प्रमुख असलेले सुनील बाबा भाटीया यांना घटल्या घटनेची माहिती देवून तातडीने येण्याची विनंती केली .सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर ट्रॅकर्स आणी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यु टिम वाईत दाखल झाली या टिमला घेवुन वाई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक वैभव पवार बिट अंमलदारचंद्रकांत मुंगसे चालक धुमाळ हे घटना स्थळावर दाखल झाले .घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी कि आसरे अंतर्गत असणार्या आंबादरवाडीचे चिकन विक्रीचा व्यवसाय करणारे उत्तम सहदेव ढवळे वय ४२ हे आसरे येथील कमंडलु हायस्कूल मध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेल्या ११ वर्षीय मुलगा अभिजित ऊत्तम ढवळे यास सोबत घेवुन  सोमवार दि.१ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रेणावळे गावच्या हद्दीत धोमबलकवडी धरणाच्या कालव्याचा बोगदा आहे .
या ठिकाणी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी लोखंडी गेट आहे .येथे धोमबलकवडी धरणाचे २० ते २५ फुट खोल पाणी साठलेले असते या डोहात ते आपल्या मुलाला पोहण्या साठीचे शिक्षण देत असतानाच हे दोघेही डोहातुन बाहेर आलेच नाहीत .
रात्र झाली तरी हे दोघेही पिता पुत्र घरी न पोहचल्याने ऊत्तम ढवळे यांच्या आई सुंदराबाई  गावात फिरुन या बेपत्ता पिता पुत्राचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही हे दोघेजण घरी परतलेच नसल्याने याची चर्चा गावात वार्यासारखी पसरल्याने आसरे गावचे पोलिस पाटील गणेश जरांडे आणी आंबादरवाडीचे पोलिस पाटील सचिन सणस आणी ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली पण काहीच हाती लागले नव्हते .
महाबळेश्वर ट्रॅकर्सचे सुनील बाबा भाटीया अमीत कोळी सचिन डोईफोडे सौरव साळेकर सौरभ गोळे अनीमेष बिरामणे आणी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यु टिमचे अजित जाधव आशीष बिरामणे ऋषिकेश जाधव आशीतोष शिंदे या दोन्ही टिमच्या कार्यकत्यांनी बोटीच्या साह्याने दिवसभर शोध मोहीम राबवून या पिता पुत्राचे मृतदेह अखेर बाहेर काढले .

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !