शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शरद पवार यांची भेट घेतली
शिवशाही वृत्तसेवा वाई तालूका प्रतिनिधी, शुभम कोदे
लोकसभा निवडणुक लागल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती मधून इच्छुकांची रस्सीखेच सुरू झाली असून. अनेक मतदारसंघात महायुती समोर नाराजी नाट्याचे प्रयोग घडत आहेत. माढा परभणी हिंगोली नंतर आता सातारा लोकसभा मतदारसंघातही नाराजी नाट्य समोर आले असून महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा लोकसभा जागा भाजपकडे असून छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपाचे उमेदवार असतील असा अंदाज आहे.
मात्र शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी या जागी उमेदवारी मागितली होती. जर उमेदवारी मिळाली नाही तर माझ्या समोर सर्व पर्याय खुले असून जो पक्ष मला उमेदवारी देईल त्यांच्याकडून मी ही निवडणूक लढवणार असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली असून शरद पवार काय निर्णय घेतात यावर आता साताऱ्याचा सामना अवलंबून असणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा