निव्वळ नफा ३४ कोटी तर एन पी ए शून्य
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर
पारनेर :- राज्यातील बँकिंग क्षेत्रात अग्रेसर व शेड्युल्ड दर्जा असलेली सॉलिसीटर गुलाबराव शेळके महानगर बँकेने चालू २०२३ व २४ या आर्थिक वर्षात उत्तुंग भरारी घेतली असून बँकेला निव्वळ ३४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे , तर एन पी ए शून्य टक्के असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा सुमनताई गुलाबराव शेळके यांनी " दैनिक पारनेर समर्थ ", शी बोलताना दिली आहे .
अध्यक्षा शेळके पुढे म्हणाल्या की , केंद्रीय रिझर्व्ह बँकेने देशातील सक्षम बॅकांसाठी नमूद केलेल्या सर्व निकषांची पुर्तता करीत गुलाबराव शेळके महानगर बँकेने मागील आर्थिक वर्षापेक्षा यंदा १३ कोटी रुपयांनी वाढवून ३४ कोटी रुपये मिळाल्याची गौरवास्पद कामगिरी केली आहे . बँक नक्त एनपीए चे प्रमाण शून्य टक्के राखण्यातही यशस्वी झालेली आहे . तर बँकेच्या सभासद , खातेदार व ठेवींदारांनी विश्वास ठेवत २ हजार ८८५ कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवल्या आहेत . तर बँकेने कर्जदारांना १ हजार ५६४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
असा एकूण ४ हजार ४४९ कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पुर्ण केला असून बँके सर्व पातळीवर नेत्रदिपक कामगिरी करत असल्याने बँकेनी विश्वासार्हता व नावलौकिक राज्यातील बँकिंग व सहकार क्षेत्रात कायम टिकवून ठेवली आहे . या कामी बँकेचे अभ्यासू संचालक , कार्यकारी संचालक यांच्या नेतृत्वाखाली कामसू अधिकारी ,कर्मचारी वर्ग , हितचिंतक सभासद , ठेवीदार व नियमित कर्ज भरणारे कर्जदार यांच्यामुळे गुलाबराव शेळके महानगर बँकेच्या अध्यक्षा सुमनताई शेळके यांनी " दैनिक पारनेर समर्थ ", शी बोलताना दिली आहे .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा