निधन वार्ता
शिवशाही वृत्तसेवा, वाई जिल्हा प्रतिनिधीः शुभम कोदे.
वाई तालुक्यातील बावधन गावचे सुपुत्र आणी कवठे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामविकास अधिकारी अवघे ३ महिने सेवा निवृत्तीला शिल्लक असणारे राजेंद्र आबाजी भोसले यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी शुक्रवार दि.८ मार्च रोजी दुपारी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाल्याने
बावधन गावा सह वाई पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचाऱ्यां मधुन एका मनमिळाऊ व्यक्ती महत्वाला गमवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे .
राजेंद्र भोसले हे बावधनच्या बगाड यात्रेसह गावच्या गाव गाड्या मध्ये कोणत्याही कामात नेहमी पुढे असायचे . सातारा येथील ग्रामसेवक संघटनेच्या पतसंस्थेचे ते पाच वर्ष व्हॉईस चेअरमन होते. बावधन येथील जीजामाता पतसंस्थेचे ते चेअरमन होते. त्यांच्यावर वाकेश्वर येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात बावधन ग्रामस्थांनच्या ऊपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंत्यसंस्कार समयी वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप विस्तार अधिकारी राहुल हजारे. आर.एस.मोरे.कृषी अधिकारी शांताराम गोळे. डि एन ई. ग्रामविकास संघटनेचे अध्यक्ष किरण निकम. तांत्रीक संघटनेचे अध्यक्ष हिंदुराव डेरे. वाई तालुक्यातील पुरुष महिलानसह सर्व ग्रामसेवक आणी ग्रामविकास अधिकारी ऊपस्थित होते .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा