दुसरबीड परिसरात लागणार पाणी टंचाईच्या झळा
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
गत काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी अल्प पाऊस झाल्याने खडकपूर्णा नदीपात्र कोरडे पडले आहे, त्यातच परिसरातील अनेक गावांची तहान भागवणाऱ्या केशव शिवणी तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे परिसरात गावांमध्ये येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाई निर्माण होणार आहे.
खडकपूर्णा नदीचे पात्रही कोरडे पडल्याने नदीच्या काठावर असलेल्या गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. दुसरबीड शिवणी तलावानेही यंदा मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. या तलावात केवळ तीन टक्के जलसाठा आहे. जऊळका, मांडवा, दुसरबीड, किनगाव राजा आदी गावांना मांडवा तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. केशव शिवणी तलावातून केशव शिवणी, मलकापूर पांग्रा आदी गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या दोन्ही तलावांनी दल गाठला आहे
केशव शिवणी येथील तलावाने तळ गाठल्याने परिसरातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवणार आहे.
गुरांच्या चारा
पाण्याचा प्रश्न गंभीर
दुसरवौड परिसरात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. त्यामुळे गुरोच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण आताच गंभीर झाला आहे. गुरांना पाणी कोठे पाजावे, असा प्रश्न आता परिसरातील पशुपालकांना पडला आहे. येत्या काही दिवसांत पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढणार आहे.
रब्बी पिके
जगवण्यासाठी धडपड
दुसरचीड परिसरात कूपनलिका आणि विहिरीची पाणीपातळीही खोल गेली आहे. त्यामुळे सध्या शेतात उभी असलेली रब्बी हंगामातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, पाणी उपलब्ध नसल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
खडकपूर्णा धरणातही मृत जलसाठा
खडकपूर्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठावरील गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. धरणातून पाणी सोडल्यास नदीकाठावरील गावांना मोठा दिलासा मिळणार आहे; मात्र यंदा अल्प पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पानेच तळ गाठला आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा