आचारसंहिता लागली, पण उमेदवाराचे काय ?
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली - आदर्श आचारसंहिता लागू झाली असून लोकसभा मतदार संघातून कोणत्या पक्षातून उमेदवार निवडणूक लढविणार यांची नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला लागली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्ष असून यात महाविकास आघाडी व महायुतीकडून अद्याप उमेदवार ठरला नाही, मात्र या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सध्यातरी कोणाच्या पारड्यात बसलेली नसल्याने ही लोकसभेची लढत मुख्यतः कोणत्या उमेदवारा सोबत होईल हे तरी सांगणे सध्यातरी श्यक्य नाही.
शिवसेनेकडून सध्याचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांनाही उमेदवारी मिळाली तर तेही निवडणूक रिंगणात उतरतील .
वर्षभरापूर्वी राज्यात शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर
त्यांच्या उमेदवारांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. याच धर्तीवर
शिवसेना ठाकरे गट, आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही गटाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी पराकाष्ठा सुरू केली असती तरी भाजप ,काँग्रेस दावा ठोकत आहे.
माजी खासदार सुभाष वानखेडे
हे शिवसेने कडून २००९ साली निवडणूक लढवून विजयी झाले होते. यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत विविध पक्षात उडी घेतली. आणि निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
यावेळी ठाकरे गटाकडूनही उमेदवारी मिळण्याची दाट श्यक्यता असल्याने ही निवडणूक कोणासोबत होईल आणि कशी होईल सध्या तरी सांगता येणार नाही. याचबरोबर बहुजन समाज पक्ष , वंचित बहुजन आघाडी, आणि एआयएमआयएम सारख्या इतर पक्षाकडून उमेदवार देण्याची श्यक्यता आहे.ही लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार लढणार याची नारीकमध्ये उत्सुकता लागली आहे. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतरच निवडणुकीची रणनिती ठरवणे सोपे होईल. उमेदवार निश्चित झाल्यानंतर अनेकांच्या गणिताला
वेगळा मार्ग निवडेलअसे ही म्हणावे लागेल.बघूया उमेदवारांची घोषणा झाल्यानंतरच कसे चित्र राहील हे लवकरच कळेल.
दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट ,राष्ट्रवादी शरद पवार गट , काँग्रेस तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट ,या दोन्ही गटातून अद्याप लोकसभेचा उमेदवार फायनल झाला नाही, त्यामुळे नागरिकांची उत्सुकता आता शिगेला लागली आहे. कारण शनिवार पासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र उमेदवार कोण याबाबत आणखी ठरले नाही. महाविकास आघाडीतून व महायुतीत उमेदवार वाटाघाटीत कोणत्या पक्षाला सोडायचा यावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्यात वेळ लागत आहे. महायुतीकडून भाजपने दावा सांगितला आहे तर दुसरीकडे शिंदे गट दावा सांगत आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट या जागेसाठी हट्ट करीत असताना राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष ही आमचा उमेदवार उभा राहील यामध्ये कोणता उमेदवार द्यायचा याचे घोडे अडले आहे. आता दोन दिवस उद्धव ठाकरे ही हिंगोली जिल्ह्यात तळ ठोकून आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी कडून ठाकरे शिवसनेकडून रुपाली राजेश पाटील गोरेगावकर तर काँग्रेस कडून सचिन नाईक प्रबळ दावेदार आहेत तर दुसरीकडे भाजपनेही दावा ठोकल्याने रामदास पाटील सोमठांणकर की डॉ. श्रीकांत पाटील हे दोन इच्छुक उमेदवार रिंगणात आहेत. आता जागावाटपात महायुतीत कोणाला सुटणार याकडे नागरिकांच्या चातक पक्षाप्रमाणे नजरा लागल्या आहेत.
महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाच्या महिला उमेदवार म्हणून रुपाली पाटील यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू आहे. पाहुयात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंगोली लोकसभेसाठी वाशीम व इतर ठिकाणच्या धर्तीवर हा मतदार संघ महिलेला सोडतील अशी श्यक्यता आहे. आजपर्यंत या मतदारसंघात पुरुष उमेदवारास संधी मिळाली मात्र महिला उमेदवारास संधी मिळाली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यावेळेस महिला उमेदवारास संधी देतील अशी आशा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना लागली असल्याचे बोलले जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा