चोरीस गेलेल्या सुमारे १ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या ३ दुचाकी वाई पोलिसांनी केल्या हस्तगत
शिवशाही वृत्तसेवा वाई तालुका प्रतिनिधी शुभम कोदे
वाई, दी. १८ : वाई तीन ठिकाणाहून तीन दुचाकी वाहने चोरणाऱ्या आदेश लालसिंग धनावडे याला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तीन दुचाकी वाहने ताब्यात घेतली आहेत.
याबाबत वाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाणे वाहनचोरीचा गुन्हा दाखल असुन, सदर दुचाकी वाहन चोरी करणारा संशयित इसम हा वाई एमआयडीसी मधील सुप्रीम बियर बार याठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना प्राप्त झाल्याने, त्यांनी वाई तपासपथकातील अधिकारी अंमलदार यांना सदरच्या संशयित इसमास ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. वाई तपासपथकातील अधिकारी अंमलदार यांनी वाई एमआयडीसीमधील सुप्रीम बियर बारचे परिसरात सापळा रचुन संशयित इसम आदेश लालसिंग धनावडे यांस ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिकची विचारपुस करता, त्याने दिनांक १६/०३/२०२४ रोजी सुलतानपुर (ता. वाई जि. सातारा) येथुन लाल काळ्या रंगाचे डिस्कव्हर वाहन क्र एमएच ११ बीएन ७७६८ ही चोरुन नेहल्याची कबुली दिली तसेच यापुर्वी मच्छी मार्केट वाई येथुन अॅक्टीव्हा वाहन क्र एमएच १२ एफएस ११८९ ही व मांढरदेव ( ता वाई जि सातारा) येथुन एचएफ डिलक्स वाहन क्र एमएच ११ सीझेड ३५१८ ही वाहने चोरुन नेहल्याचे सांगितले.
याबाबत वाई पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद आहेत. अशी एकुण १ लाख ८० हजार रुपये किंमतीची तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक . समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई, वैभव पवार सहा.पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, सुधीर वाळुंज, पोलीस हवालदार मदन वरखडे, अरुण पाटणकर, उमेश गहीण, अजित
जाधव पो.ना कुंभार, पो.शि. राम कोळी, प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, हेमंत शिंदे, विशाल शिंदे यांनी केली आहे. याबद्दल वाई पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा