सामाजिक वनीकरणाचे अतिशय दुर्लक्ष
शिवशाही वृत्तसेवा, सोयगाव तालुका.प्रतिनिधी.. रईस शेख
सोयगाव.. तालुक्यातील सावळदबारा व जवळच असलेले बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा घाटामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आले होते मात्र लागवडीला योग्य संगोपना अभावी सामाजिक वनीकरण विभागाचे अतिशय दुर्लक्ष दिसून येते आहे वन विभागाचे काम आहे असलेल्या झाडांचे रक्षण करणे तर सामाजिक वनीकरण हे वृक्षरोपण करण्यास प्रोत्साहन देते नर्सरी उभारून जनतेला तसेच शाळा विद्यालय महाविद्यालयाच्या परिसरात लागवडीसाठी रोपे पुरवठा करणे यासाठी शासनाकडून सामाजिक वनीकरणाला लाखो रुपयाचा निधी शासन खर्च करतो मागील दोन-तीन वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आले आहे व संवर्धन यासाठी शासनाची नियमित कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणाने वृक्षांच्या संवर्धना अभावी अनेक वृक्ष नष्ट होण्याची भीती आहे विविध प्रजातीच्या झाडांची लाखो रुपये खर्च करून लागवड करण्यात आली.
मात्र सदर लागवड करण्यात आलेल्या झाडांची संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने जवळपास 50 टक्के झाडे नष्ट झाली असून झाडांना पाणी देणे तर सोडा लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या आजू बाजूचा केरा कचरा सुद्धा कापण्यात आलेला नाही लागवडीसाठी खोदण्यात आलेले अनेक खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड दिसुन येत नाही तरी सामाजिक वनीकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सामाजिक वनीकरणाचा निधी योग्य ठिकाणी वापरण्यात आला कि नाही याचीही शहानिशा करून दोषीवर कडक कारवाईची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मराठवाडा सरचिटणीस गोकुळसिंग राजपूत यांनी केली तसेच आंदोलनाचा इशाराही दिला आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा