maharashtra day, workers day, shivshahi news,

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळाला भरघोस मदत निधी - आमदार समाधान आवताडे

मतदारसंघात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १७ कोटी ७३ लाख मंजूर
MLA samadhan autade  ,Substantial relief to farmers affected by bad weather , pandharpur ,shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२३ ला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासनाकडे मदतीची मागणी केली होती ती मागणी मान्य होऊन मंगळवेढा तालुक्यासाठी ११ कोटी ६८ लाख रुपये व पंढपूर मतदारसंघात ६ कोटी ५ लाख मदत मंजूर झाली असून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की नोव्हेंबर मध्ये अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांच्या असणाऱ्या द्राक्षे, डाळिंब, आंबा, पेरू, केळी, पपई, ज्वारी, मका, हरभरा, कांदा, करडई, सोयाबीन, सूर्यफूल, तूर, मटकी, बाजरी, हुलगा यासारख्या तसेच भाजीपाला व इतर सर्व निरनिराळ्या पिकांचेसुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते त्या पिकांची पाहणी करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे नुकसान झालेल्या पिकांची आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची नेमकी वस्तूस्थिती मांडली होती त्यावेळी मंत्री महोदय यांनी मतदारसंघातील या सर्व शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पिकांचे पंचनामे करून भरीव शासकीय मदतीच्या रूपाने भक्कमपणे पाठीमागे उभा राहणार असल्याचे आश्वस्त केले आहे. शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकाचे अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला होता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांची बाजू लावून धरल्याने ही मदत मंजूर झाली असून बळीराजाला आपल्या दुःखावर फुंकर घालण्याचे काही प्रमाणात बळ निर्माण झाल आहे.
सदर अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार असून जिरायत पिकासाठी १३ हजार ६०० रुपये, बागायत पिकासाठी २७ हजार रुपये तर फळबागेसाठी ३६ हजार रुपये या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून मंगळवेढा तालुक्यातील ६ हजार ९८५ तर पंढरपूर मतदारसंघातील ७ गावच्या १६८२ हेक्टर वरील २२५४ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे 
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !