maharashtra day, workers day, shivshahi news,

मुळा उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे माजी -आमदार बाळासाहेब मुरकुटे..

हाता तोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून चालली आहे
MLA Balasaheb Murkute , Crops that have come to hand are burning due to lack of water , Nevasa , Ahmednagar ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा,बालाजी देडगाव जिल्हा प्रतिनिधी विष्णू मूंगसे
रुबी हंगामात सुटलेल्या आवर्तनाला दोन महिने पूर्ण झाले असून तालुक्यातील पाण्याची सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक झालेली आहे. हाता तोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. शेतकऱ्यांनी शेतात गहू, हरभरा, मका इत्यादी पिके केलेली आहेत.. 
ही पिके अंतिम पाण्यावर असून पाणी पातळी अत्यंत खालवल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. यासाठी तातडीने मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्याची मागणी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन द्वारे केली आहे. दरम्यान बाबत नेवासा तालुक्याचे माजी आमदार मुरकुटे  म्हणाले  आहेत.
की पाण्याची परिस्थिती गंभीर झाल्यामुळे पिण्याचे पाणी शेती व जनावराच्या चाऱ्याचेही प्रश्न मोठा प्रमाणात भेडसावत कालव्यातून तातडीने आवर्तन सोडल्यास हे सर्व पिकाचे नुकसान होणार आहे. मागील वर्षी सततच्या पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी पूर्ण उध्वस्त झालेली आहेत. यातच रुबी हंगामातील पिके ही आतिम पाण्यावर असल्याने पाणी पातळी खाली गेल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होतं नाही यातच जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे.
या सर्व परिस्थितीत आज जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्यासमोर निवेदनातून माजी आमदार यांनी एक एप्रिल रोजी पाणी सोडण्यास शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळून यांची पिके वाचू शकतात गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांना शेतीतून कुठले उत्पन्न मिळू शकलेले नाही यावर्षी रुबी हंगामात पिके शेवटच्या टप्प्यात असताना पाणी नसल्यामुळे तेही धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे आपण एक एप्रिल 20- 24 रोजी तातडीने मुळा उजवा कालव्यातून आवर्तन सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार मुरकुटे यांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे केली आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !