maharashtra day, workers day, shivshahi news,

जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेचा कर मुदतीपूर्वी भरावा

मुख्याधिकारी श्रीमती स्मिता काळे यांचे आवाहन
Citizens should pay tax before due date to avoid confiscation action , Shirur , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

आर्थिक वर्ष संपण्यास ५ दिवस राहिल्याने शिरूर नगर परिषद घोडनदी करसंकलन विभागाने करवसुलीची मोहीम तीव्र केली आहे. कर न भरल्यास जप्तीची कारवाई, नळ जोडणी तोडणे, थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करणे अशी कार्यवाही करण्याबाबत च्या सूचना यापूर्वी मालमत्ता धारकांना दिलेल्या आहेत त्यामुळे कराचा भरणा करावा व कटू कारवाई टाळावी असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती स्मिता काळे यांनी केले आहे.
शिरूर शहरात १४ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून करवसुलीसाठी नगरपालिकेचे ५ वसुली विभाग आहेत. आतापर्यंत फक्त ४०% कर वसूली झाली आहे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघे दिवस राहिले आहेत. त्यामुळे करवसुलीसाठी करसंकलन विभागाने मालमत्ताजप्ती व नळजोड तोडण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत २ मालमत्तावर जपतीची कार्यवाही व २६ मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडले आहेत. आणि थकबाकी असलेल्या मालमत्तेचे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचयाती व औध्योगिक नागरी अधिनियम १९६५ कलम १५२ नुसार जप्ती वारंट काढले असुन मालमत्ता जप्तीची कार्यवाही तीव्र केली जाणार आहे. वारंवार कर भरण्याचे आवाहन करून आणि कर भरण्याची क्षमता असतानाही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांची नावे रिक्षातून ध्वनिवर्धकाद्वारे जाहीर केली

जाणार आहेत. दैनिकांमधूनही थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्यामुळे सर्व मालमत्ता धारकांना आवाहन करण्यात येते की आपल्या मालमत्तेचा थकीत व चालू कर त्वरित भरणा करून कटुता टाळावी तसेच नगरपालिकेस सहकार्य करावे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !