7 आरोपी विरोधात गुन्हा दाखल.
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
सुनेगाव ते हळद जाणारे पांदण रस्त्यावर लिंबाच्या झाडाखाली 7 जन बावन पत्त्याचा हार जितचा खेळ खेळत असल्याबाबत माहिती लोहा पोलिसांना मिळाली. सदर माहितीवरून पीएसआय रोडे साहेब लाडेकर डफडे राठोड गुट्टे गिरे यांनी सदर ठिकाणी जाऊन रेड केला.यातील तीन आरोपींना पोलिसांनी पकडले तर इतर 4 आरोपी पोलिसांना पाहून घटनास्थळावरून झाडे झुडपात पळून गेले.
सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी डावावरून बावन पत्त्याचे 11 कॅट, बसायच्या दोन चटया, रोख रक्कम, दोन मोटारसायकली जप्त केल्या.पीसआय रोडे साहेब यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे पोलीस स्टेशन लोहा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.काल रोजी पण लोहा सहारा मध्ये लोहा पोलिसांनी एका जुगार आड्यावर छापा टाकून 2 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून 29,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा