maharashtra day, workers day, shivshahi news,

महिला दिनानिमित्त जागर नारी शक्तीचा शिरूर येथे कार्यक्रम संपन्न...

हळदी कुंकू व महिला स्नेह मेळावा आयोजित
Jagar Nari Shakti on Women's Day ,  Haldi Kunku and Mahila Sneh Melawa organized ,Shirur , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, शिरूर तालुका प्रतिनिधी,फैजल पठाण
 8 मार्च महिला जागतिक दिवस म्हणून पाळला जातो त्याचेच अवचित्य साधून शिरूर मध्ये सुखकर्ता को -ऑफ- क्रेडिट सोसायटी यांच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिन व जागतिक ग्राहक सेवा दिनाची औचित्य साधून हळदी कुंकू व महिला स्नेह मेळावा 15 /3/ 2024 रोजी दुपारी तीन ते सहा यावेळी शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आला आयोजित करण्यात आला. यावेळी एडवोकेट कोमल प्रशांत बोरा ,सौ. अंजलीताई थोरात माजी नगरसेविका, 
सौ. मनीषाताई कालेवार माजी नगरसेविका, सौ. शोभनाताई पाचंगे, सौ. ऐश्वर्या केशव लोखंडे, सौ. अनघाताई पाठक (संयोजक भाजपा शिरूर लोकसभा) प्रिया बिरादार (महिला अध्यक्ष शिरूर शहर भाजपा) तसेच निमंत्रक म्हणून श्री तानाजी गणपत मोहिते साहेब चेअरमन सुखकर्ता को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड हे उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्त्या म्हणून सौ पद्माताई प्रदीप राव कुबेर (सेवा भारती स्वावलंबन प्रमुख, महाराष्ट्र राज्य) यांनी महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !