maharashtra day, workers day, shivshahi news,

गळ्यात दोरीचा फास लावून व डोक्यात दगड घालून नवऱ्यानेच केली 34 वर्षीय विवाहितेची हत्या

आरोपी नवरा पोलिसांच्या ताब्यात, परिसरात उडाली खळबळ 
Husband killed his wife ,  naigaon , nanded , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील  पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोजे मनुर तब तालुका नायगाव येथील विवाहितेला नवऱ्याने रात्रीच्या वेळी मारहाण केली व सकाळी डोक्यात दगड घालून व गळ्याला दोरीचा फास बांधून तिच्या जीवन संपविले  सदर घटना सकाळी 12 वाजता उघडकीस आली. 
या घटनेमुळे मनुर परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. सदर महिला हे लक्ष्मीबाई शिवशंकर हांडेवाड वय वर्ष 34 रा. मनुर या विवाहितेचे लग्न शंकर एकनाथ हांडेवाड वय वर्षे 35 यां शेतकऱ्याशी झाले होते.  त्यांना  दोन मुले एक मुलगी आहे. संसार काही दिवस भानगडीचाही चालत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे . सदर विवाहितेला दोन मुलं व एक मुलगी असून सदर मुले हे माहेरी शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली असून नवरा बायको दोघेच  मनुर तब येथे राहत होते. 
नवरा सतत दारू पिऊन दररोज भांडण करत असत त्यामुळे नवऱ्याने दारू पिऊन त्या महिलेला घरातच मारहाण केली व गळ्याला दोरीचा फास बांधून जीवन संपविले अशी माहिती प्राथमिक तपासणीमध्ये समोर आली आहे . त्यामुळे सदर महिलेच्या डोक्यावर व तोंडावर मार असल्याचे  चित्र दिसून येत आहे. नवरा शंकर एकनाथ हांडेवाड वय 35 यास पोलीसांनी त्याबाबत घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बीट प्रमुख पवार हे करीत आहेत.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !