तीन लक्ष रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिस मिळवले
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
सिंदखेराजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील जनता विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शासकिय उपक्रमशिल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला सिंदखेडराजा तालुक्यातील शासकिय व निम शासकिय चोपन्न शाळांनी सहभाग नोंदविला. तीन लक्ष रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे. केंद्रस्तर, गट स्तर, वजिल्हास्तर अशाप्रकारे त्रिस्तरीय मुल्यांकनाद्वारे स्पर्धेचे बक्षिस गुणांद्वारे ठरविण्यात आले. त्यामध्ये सिं राजा तालुक्यातून जनता विद्यालयाने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. शाळेचे मुल्यांकण विविध निकशांच्या आधारे करण्यात आले, त्यामधे गुणवत्तापूर्ण शिक्षण, शालेय व सहशालेय उपक्रम, भौतीक सुविधा,शिक्षक विद्यार्थी गुणवत्ता, शालेय परसबाग, विविध जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेतील शालेय सहभाग व विद्यार्थी उपस्थिती या इतर निकशांच्या आधारे मूल्यांकन करून क्रम ठरविन्यात आले.
राज्यभरात दिड महिन्यापासून चाललेल्या बहुस्तरीय स्पर्धेचे बक्षिस वितरण 12 मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी (जि. प.) विशाल नरवाडे व अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात आले. यावेळी दे. राजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल सिंगलकर, सचिव सुबोध मिश्रीकोटकर न संचालक पदमकुमार डोणगावकर व मुख्याध्यापक के आर घुमाळ यांनी मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा' चे प्रथम क्रमांकाचे वाक्षिस देऊन गौरवण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील ४८ शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा