सायकल खेळण्याकरता गेलेला मुलगा परत आला नाही
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली शहरातील श्रीनगर रीसाला बाजार भागातील ११ वर्षीय मुलगा सायकल घेऊन खेळण्याकरता गेला असता तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटूुंबियांनी गुरुवारी १४ मार्चला हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली शहरातील श्रीनगर दिसाला बाजार भागातील आदित्य सागर बक्षी (११) हा इयत्ता सहावी वर्गात शिक्षण घेतो. बुधवारी ता. १३ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तो सायकल खेळण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. सायंकाळी उशीरा पर्यंत तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. नातेवाईकांकडेही माहिती घेतली असता त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.
त्यानंतर या घटनेची माहिती हिंगोली शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, उपनिरीक्षक कपील आगलावे, जमादार संजय मार्के यांच्या पथकाने त्याचा शोध सुरु केला. पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसरासह इतर ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र सायंकाळी उशीरा पर्यंत परत आला नाही.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा